श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 20:06 IST2024-10-10T20:04:46+5:302024-10-10T20:06:45+5:30
आमदार मुटकुळे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
BJP MLA ( Marathi News ) : भाजपचे हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आमदार तानाजी मुटकुळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आमदार मुटकुळे यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आज त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आमदार मुटकुळे यांना नांदेड विमानतळावरून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत नेण्यात आले.
दरम्यान, हिंगोलीचे आमदार असलेले तानाजी मुटकुळे हे यंदा आपले चिरंजीव शिवाजी मुटकुळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी उत्सुक असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यांच्या मतदारसंघात सध्या सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील सुमठानकर आणि डॉ. विठ्ठल रोडगे यांनीही निवडणूक तयारी सुरू केल्याने यंदाची निवडणुकीत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.