शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीवरून 'तंटा'; माजी अध्यक्षाचा लोखंडी रॉडच्या मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 18:50 IST

नवीन तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्याच्या कारणावरून चावडीवर केली माजी अध्यक्षाला लोखंडी रॉडने मारहाण

- रमेश कदम आखाडा बाळापुर ( हिंगोली): तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून माळधावंडा येथे मोठा 'तंटा' उभा राहून माजी अध्यक्षाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

याप्रकरणी पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. गावातील माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आनंदराव मस्के हे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ६ : ३० वाजण्याच्या सुमारास गावातील तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोरील चावडीवर मुलगा अभिषेकसह बसले होते. त्यावेळी संगनमत करून काहीजण तिथे आले. त्यांनी बाळासाहेब मस्के यांच्यासोबत तंटामुक्ती अध्यक् निवडीवरून आणि मागील भांडणावरून वाद घातला. तसेच अचानक लोखंडी रॉड, लाकडी काठीने मारहाण केली. यात बाळासाहेब मस्के,  अभिषेक मस्के गंभीर जखमी झाले. प्रकृती गंभीर असल्याने बाळासाहेब मस्के यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात अधिकच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. 

या प्रकरणी अभिषेक बाळासाहेब मस्के यांच्या फिर्यादीवरून शंकरराव भगवानराव मस्के , विकास शंकरराव मस्के, अविनाश शंकरराव मस्के, उर्मिलाबाई शंकरराव मस्के , विद्या विकास मस्के , रूपाली अविनाश मस्के , दिलीपराव भगवानराव मस्के, भुजंगराव दिलीपराव मस्के (सर्व राहणार माळधांडा तालुका कळमनुरी)  यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 , 103 (1 ) , 189 ( 2 ) , 191( 2 ) , 191 ( 3 ) , 190 , 352 , 351 ( 2  ) ( 3 ) ,  54 , 118 ( 1 ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे करीत आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष होण्याच्या कारणावरून माजी तंटामुक्ती अध्यक्षांचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  गावागावातील वाद गावातच मिटवण्यासाठी व गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृह विभागाने निर्माण केलेल्या तंटामुक्त ग्राम समित्यावादाचे कारण ठरल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी