शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

‘सॅम्पल’च्या नावाने घेतात २ किलो तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:54 AM

नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी वेगवेगळे फंडे वापरुन शेतकºयांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार सुरु आहे. पूर्वी खरेदी विक्री संघाकडे तूर खरेदी असतानाही गोंधळ होता. आता बाजार समितीकडे खरेदी आली तर एवढ्या दिवसांनंतर पुन्हा ओरड सुरू झाली. तूर खरेदी करत असलेल्या बारदान्याचे वजन ६०० ते ६५० ग्रॅम असल्याने ५० किलो तुरीच्या कट्यामागे ६०० किंवा ६५० ग्रॅम तूर घेणे गरजेचे असते; परंतु येथे सर्रासपणे ५० किलो ९०० ग्रॅम घेण्याचा सपाटा सुरु आहे. एका कट्ट्यामागे शेतक-यांची जवळपास २०० ते २५० ग्रॅम तूर जास्त घेतली जात आहे. अशी एका दिवसातून जेवढे क्ंिवटल तूर खरेदी होते, तेवढ्यात प्रतिक्ंिवटल अर्धाकिलो तरी जास्त माल जातो. बाजार समितीला प्रतिक्विंटल तूर खरेदीमागे एक ते दिड रुपये कमिशन नियमाने दिले जाते. याच कमिशनमधून सर्व खर्चाचे नियोजन करणे अपेक्षित असते. मात्र येथे तसे न होता तूर जास्तीची तूर घेवून शेतकºयांवरच हा भार टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. शिवाय या ठिकाणी हमाली व मापाईच्या नावाखाली ३० रुपये घेतले जात आहेत. यात हमाली १८ ते २० रुपये दिली जाते तर मापाई प्रतिक्विंटलला साडेतीन रुपये. यातून सर्व खर्च वगळता प्रतिक्विंटल ६ ते ७ रुपये जास्त घेतले जात असल्याचे म्हणने आहे. तर मुख्य बाब म्हणजे येथे ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंतच आॅनलाईन नोंदणी झालेली असली तरीही नंतर कागदपत्रे घेऊन आलेल्या शेतकºयांची नोंदणीच झालेली नसल्याचे समोर आले. अजून ८०० ते ९०० शेतकºयांची नोंद बाकी आहे.हिंगोली : आॅनलाईन नोंदणीही वाºयावरहिंगोलीतील बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी शेतकºयांना सर्व प्रथम आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी असेल तरच त्या शेतकºयाची तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळेच नियमाने तूर खरेदी करण्यासाठी शेतकरी कागदपत्रे घेऊन नोंदणी कक्षाजवळ जात आहेत. तर तेथेकोणीच हजर राहत नाही. राहिलेच तर कागदपत्रे घेऊन नोंदणीविना फेकून दिले जात आहेत. त्यामुळे नोंदणी न झालेल्या शेतकºयांना पुन्हा नोंदणी करणे अडचणीचे ठरणार आहे. यावर वरिष्ठांचा अंकुशच नसल्याने हे प्रकार घडत आहेत.वखार महामंडळाच्या गोदामात तूर नेल्यानंतर अडचण निर्माण होऊ नये म्हणून तूर खरेदी करताना तुरीचे १०० ग्रॅम सॅम्पल घेतले जाते. मात्र जास्तीचे घेतल्याची तक्रार असल्यास चौकशी करू, असे सचिव पाटील यांनी सांगितले.