गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा- सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:20 IST2018-04-28T00:20:45+5:302018-04-28T00:20:45+5:30

येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सभापती स्वाती पोहकर यांनी विविध विभागाला भेटी दिल्या. या भेटीत नेहमीप्रमाणे पंचायत समिती कार्यालयात निम्म्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी हजरच नव्हते. सातत्याने अनधिकृतपणे गैरहजर राहणाºया कर्मचाºयांविरोधात कारवाईची मागणी सभापती स्वाती पोहकर यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

 Take action on absent employees - Speaker | गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा- सभापती

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा- सभापती

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सभापती स्वाती पोहकर यांनी विविध विभागाला भेटी दिल्या. या भेटीत नेहमीप्रमाणे पंचायत समिती कार्यालयात निम्म्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी हजरच नव्हते. सातत्याने अनधिकृतपणे गैरहजर राहणाºया कर्मचाºयांविरोधात कारवाईची मागणी सभापती स्वाती पोहकर यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
येथील पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी दौºयाच्या नावाखाली सातत्याने कार्यालयात गैरहजर राहतात. अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात थांबत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे, विकास कामे निर्धारित वेळेत होत नाही. या विरोधात पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी सातत्याने ओरड करूनही कुठलाच उपयोग होताना दिसत नाही. २७ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास सभापती पोहकर यांनी कार्यालयातील विविध कक्षांना भेटी दिल्या. या भेटीत जवळपास सर्वच कक्षातील कर्मचारी दुपारपर्यंत कार्यालयात आलेच नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकारासंबंधी सभापती पोहकर यांनी बीडीओंकडे तक्रार करीत संबधित कामचुकार कर्मचाºयांविरोधात तातडीने कारवाईची मागणी केली.

Web Title:  Take action on absent employees - Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.