शिरडशहापूर येथे सातवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 19:45 IST2018-03-19T19:45:23+5:302018-03-19T19:45:23+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.

शिरडशहापूर येथे सातवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. राजेश गुहाडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
गवलेवाडी येथे राहणारा राजेश सातव्या वर्गात शिकतो. त्याचे वडील पांडुरंग गुहाडे हे भानुदास महाजन यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत. राजेशने सकाळी उठून शेतातील कापसाच्या प-हाट्या काढल्या. वडिलांनी शाळेत जा असे सांगून ते बाहेरगावी गेले. यानंतर राजेशाही शेतातून शाळेत जातो म्हणून निघाला; परंतु त्याने आखाड्यावरून ठिबकचा पाईप घेऊन जवळच असलेल्या शाहेद कादरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेतला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका शेतकर्याने हे पाहिले असता त्याने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जमादार प्रकाश नेव्हुल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रेतास शवविच्छेदनसाठी वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद झाली नाही.