मानसिक छळास कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:00 IST2019-04-11T00:00:04+5:302019-04-11T00:00:17+5:30
वसमत तालुक्यातील पुयणी खुर्द येथे पिकअप घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक, शारीरिक छळास कंटाळून विवाहित महिलेस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी पाच जणाविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिक छळास कंटाळून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ुकुरूंदा : वसमत तालुक्यातील पुयणी खुर्द येथे पिकअप घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक, शारीरिक छळास कंटाळून विवाहित महिलेस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी पाच जणाविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुयणी खुर्द येथील मयत शीला माधव चोपडे (३०) या महिलेस आरोपींनी संगनमत करून यातील मयत यास पिकअप घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत होते. शारीरिक व मानसिक छळ केल्याने त्रासाला कंटाळून ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शेतामध्ये कोणतेतरी विषारी द्रव प्राशन केले. उपचारासाठी नांदेड येथे हलविले असताना रात्री उशिरादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी डीवायएसपी सतीश देशमुख, फौजदार वाघमोडे, जमादार वाकळे यांनी भेट दिली. या प्रकरणी फिर्र्यादी नामदेव नादरे (रा. माळवटा) यांच्या तक्रारीवरून कुरूंदा ठाण्यात आरोपी पती माधव चोपडे, सासू सखूबाई चोपडे (रा. पुयणी), नणंद पदमाबाई जामगे, चांदू जामगे, किशन जामगे (रा. पिंपराळा) यांच्याविरूद्ध कलम ३०६, ४९८, (अ), ३२३,५०४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.