शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हिंगोलीत दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:47 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनात येणार्‍या अडचणी समजून घेत ते अभ्यासक्रमात मागे न राहता त्यांचा बौद्धीक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हिंगोली : दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनात येणार्‍या अडचणी समजून घेत ते अभ्यासक्रमात मागे न राहता त्यांचा बौद्धीक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष गरजा असणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष शिक्षक शाळेत जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.

यावेळी विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांचे अध्ययन-अध्यापन पद्धतीत येणारे आव्हाने व त्यावरील उपाय-योजना याबबात मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीत  एकूण ४ हजार ७४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणार्‍या अडचणींचा शोध घेऊन त्यांना नेमके काय शिकवायला हवे, त्यांचा प्रथम अध्ययन-अध्यापन स्तर निश्चित केला जात आहे. त्यानंतरच विशेष गरजा असलणार्‍या या विद्यार्थ्यांना आवश्यक क्षमतेनुसार शिक्षण दिले जात आहे. १० पेक्षा जास्त दिव्यांग विद्यार्थी असणार्‍या जि. प. च्या शाळा ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाभरातील जि. प. च्या शाळांत हा उपक्रम राबविला जात असून २८ विशेष शिक्षक दिव्यांगांच्या अध्ययनस्तर निश्चितीसाठी परिश्रम घेत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांकडे वैद्यकीयदृष्ट्या न पाहता, त्यांच्याकडे शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहावे व त्यांना अभ्यासात येणार्‍या अडीअडचणी, समस्या समाजावून घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

विषय तज्ज्ञ, विशेष शिक्षकांची कार्यशाळासमावेशित शिक्षण अंतर्गत विषयतज्ज्ञ व विषय शिक्षकांची दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांचे अध्ययन-अध्यापन पद्धतीत येणारे आव्हाने व त्यावरील उपाय-योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, विभागप्रमुख नाईकनवरे, जिल्हा समन्वयक मंगनाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाzpजिल्हा परिषदeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र