व्यापाऱ्यास मारहाण; दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:59 IST2018-11-11T00:58:50+5:302018-11-11T00:59:05+5:30

फटाके का देत नाहीस? या कारणावरून एकास जबर मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

 Striking a Merchant; Trial against ten people | व्यापाऱ्यास मारहाण; दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

व्यापाऱ्यास मारहाण; दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : फटाके का देत नाहीस? या कारणावरून एकास जबर मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, हिंगोली शहरातील व्यापारी श्याम हरिप्रसाद अग्रवाल यांच्यासोबत फटाके का देत नाहीस, या कारणावरून आरोपींनी वाद घातला. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून अग्रवाल यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण केल्याप्रकरणी श्याम अग्रवाल यांनी हिंगोली शहर ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी बालाजी घुगे तसेच रोहन धनमने, मटू घुगे व इतर सात एकूण दहा जणांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राठोड करीत आहेत.
डॉक्टर का आले नाहीत, या कारणावरून मारहाण
हिंगोली : डॉक्टर ताबडतोब का आला नाही, या कारणावरून वाद घालत शेख नजीर शेख कदीर यास अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरातील श्वास क्रीटीकेअर हॉस्पिटल येथे १० नोव्हेंबर रोजी घडली. तसेच दवाखान्यातील साहित्यांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी शेख नजीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम नागरे, भागवत बांगर (रा. हिंगोली) या दोघाविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Striking a Merchant; Trial against ten people