शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी कडक उयाय योजा -गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

शुक्रवारी झूम ॲपद्वारे गायकवाड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...

शुक्रवारी झूम ॲपद्वारे गायकवाड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार उपस्थित होते.

यावेळी गायकवाड यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. याकरिता या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती घेत प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण करण्यात येत असून, ग्रामीण भागातून यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. याकरिता जनजागृती करून जनतेला लसीकरण करून घेण्याबाबत प्रोत्साहित करावे, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी जिल्ह्यात मागील पूर्ण वर्षभरात ४ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते; परंतु टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दि.१ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२१ पर्यंतच्या कालावधीत ४ हजार २४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली. रुग्णामंध्ये वाढ होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे, तसेच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध आहेत. कोविडची सर्व केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तसेच खाजगी दोन डीसीएचसी व दोन सीसीसी सेंटर सुरू करण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा साठा मुबलक आहे. आयसीयूमध्ये दाखल रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करायचा असताना इतर रुग्णांनाही रेमडेसिवीरचे इंजेक्शन देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या असून, रेमडेसिवीर इंजेक्शनचा विनाकारण वापर केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे सांगितले .

आरटीपीसीआरची नवीन मशिन

रुग्णांच्या तपासणीसाठी नवीन आरटीपीसीआर मशीन मागविली आहे. ही मशीन उपलब्ध झाल्यावर आरटीपीसीआरच्या टेस्ट वाढणार आहेत. जिल्ह्यातील वसमत व कमळनुरीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे. जी गावे जास्त प्रभावित आहेत ती गावे कंटेन्मेंट झोन घोषित केल्याचे जयवंशी यांनी सांगितले.