दोन गटांत वाद झाल्याने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:13 IST2019-09-15T23:13:23+5:302019-09-15T23:13:40+5:30
जागेच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमल्याने पोलीस दाखल झाले.

दोन गटांत वाद झाल्याने तणाव
हिंगोली : जागेच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमल्याने पोलीस दाखल झाले. शहरातील बडेरा कॉम्पलेक्स समोरील मोकळ्या जागेच्या कारणातून हा वाद झाल्याचे समोर येत आहे. परंतु यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरूष तसेच युवक घटनास्थळी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच पोलिसांची व्हॅन घटनास्थळी पोहोचली. याप्रकरणी उशिरापर्यंत ठाण्यात कोणतीच नोंद झाली नव्हती.