शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

अजूनही ८३८ घरकुले अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:45 AM

मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे.पंतप्रधान आवास योजनेत २0१६ ते २0१९ या काळात ५१८३ घरकुलांचे उद्दिष्ट होते. औंढा नागनाथ ८५२, वसमत १११३, हिंगोली ७६३, कळमनुरी १३२३, सेनगाव ११३२ असे उद्दिष्ट आहे. नवीन उद्दिष्टासह १0४५५ घरकुलांसाठी लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. यापैकी ५३९७ जणांना पहिल्या हप्त्याचे वितरण झाले आहे. यापैकी ४४५५ जणांना दुसरा हप्ता दिला आहे. तर ४२१३ जणांना तिसरा हप्ता दिला आहे. २१४८ जणांना चौथाही हप्ता दिला आहे. या कामांपैकी मात्र एकूण ४३४५ कामे पूर्ण झाली आहेत. तर ८३८ कामे अजूनही अपूर्ण आहेत. यामध्ये औंढा ११४, वसमत २८९, हिंगोली ९१, कळमनुरी १४७, सेनगाव १९७ अशी संख्या आहे.रमाई घरकुल योजनेत तर वेगळेच चित्र आहे. २0१६-१९ या कालावधीत एकूण ५७६६ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. यामध्ये औंढा ७२९, वसमत ११0९, हिंगोली १२७६, कळमनुरी १४४१, सेनगाव १२११ अशी संख्या आहे. यातील ४५६७ घरकुल लाभार्थ्यांची खातेक्रमांकासह पडताळणी झाली होती. यापैकी ४३२३ खात्यांवर पहिला हप्ता तर १0६६ जणांना चौथा हप्ता मिळाला आहे. यापैकी २६८३ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर अद्यापही ३0८३ घरकुलांचे काम रखडलेले आहे. यात औंढा ४८३, वसमत ४९६, हिंगोली ६९१, कळमनुरी ७१८, सेनगाव ६९५ अशी संख्या आहे. प्रधानमंत्री आवासपेक्षा यात रखडलेली कामे जास्त आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर