वसमत येथे सप्टेंबर महिन्यात छत्रपतींचा पुतळा बसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST2021-01-18T04:27:31+5:302021-01-18T04:27:31+5:30
वसमत : शहरातील शिव उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा सप्टेंबर अखेरपर्यंत बसविण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी वसमत ...

वसमत येथे सप्टेंबर महिन्यात छत्रपतींचा पुतळा बसणार
वसमत : शहरातील शिव उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा सप्टेंबर अखेरपर्यंत बसविण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी वसमत येथे झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.
वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुतळा समितीने पुतळा तयार करण्याची ऑर्डर शिल्पकारास दिली आहे. रविवारी पुतळा समितीची बैठक झाली. बैठकीस माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आ. राजू नवघरे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, अ. हफीज अ. रहेमान, सुनील काळे, सुभाष लालपोतू, नवीनकुमार चौकडा, सिताराम म्यानेवार, शिवाजी अडलिंगे, काशिनाथ भोसले, दिपक मुंदडा, तान्हाजी कदम, संजय भोसले यांच्यासह समिती सदस्य व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
पुतळा समिती सचिव सुनील काळे यांनी प्रास्ताविकात आजपर्यंत झालेल्या कामाची व पुतळा उभारणीची तयारी संदर्भात माहिती दिली. सप्टेंबर अखेरपर्यंत पुतळा उभारणीचे काम पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आ. राजू नवघरे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान, शिवदास बोड्डेवार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यास सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे पुतळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.