करंजी परिसरात उन्हाळी भुईमूग काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:01+5:302021-05-07T04:31:01+5:30
करंजी : करंजीसह परिसरातील चार ते पाच गावांमध्ये दोन दिवसांपासून उन्हाळी भुईमूग काढणीस प्रारंभ झाला आहे. उन्हाचा पारा वाढू ...

करंजी परिसरात उन्हाळी भुईमूग काढण्यास प्रारंभ
करंजी : करंजीसह परिसरातील चार ते पाच गावांमध्ये दोन दिवसांपासून उन्हाळी भुईमूग काढणीस प्रारंभ झाला आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे मजुरांच्या मदतीने लवकरात लवकर भुईमूग काढणी कशी करता येईल याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
खरीप हंगामात झालेल्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी करंजी, दारेफळ, गुंडा, विरेगाव भागातील शेतकऱ्यांनी दुहेरी उत्पादन देणाऱ्या उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली. यावर्षी पाण्याची मुबलकता असल्याने उन्हाळी भुईमूगही चांगला आला. दोन दिवसांपासून उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू झाली आहे. करंजीसह परिसरात पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी वांगी, टोमॅटो, कोबी, कांदा व इतर पालेभाज्यांची लागवड केली आहे. कोरोना महामारीमुळे पालेभाज्यांना चांगला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत.
फोटो ३