धक्कादायक ! वृद्ध महिलेची हत्या करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:42 IST2020-08-11T14:39:42+5:302020-08-11T14:42:06+5:30

वृद्ध महिला घरी एकटीच राहत होती

Shocking! Robbers killed an old woman and stole gold jewelry | धक्कादायक ! वृद्ध महिलेची हत्या करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवले

धक्कादायक ! वृद्ध महिलेची हत्या करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवले

ठळक मुद्देचोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला

सेनगाव : तालुक्यातील साखरा येथे चोरट्यांनी वृद्ध महिलेस बेदम मारहाण करून हत्या करत जवळपास दिड लाखाचे दागिने लंपास केले. मनकर्णाबाई तुळशीराम सरुळे (७०)  असे मृत वृद्धेचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मनकर्णाबाई तुळशीराम सरुळे या तालुक्यातील साखरा येथे एकट्याच राहतात. त्यांच्या मुलाचे रिसोड येथे दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री १ ते ४ च्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.  पैसे आणि दागिन्यांची मागणी करत चोरट्यांनी मनकर्णाबाई यांना बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. चोरीच्या प्रकारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 

Web Title: Shocking! Robbers killed an old woman and stole gold jewelry