धक्कादायक ! अन्नात विष कालवून ३ मुलांसह मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 13:31 IST2019-07-25T13:30:35+5:302019-07-25T13:31:53+5:30

वेळीच रूग्णालयात दाखल केल्याने सर्वजण धोक्याबाहेर आहेत.

Shocking! Mothers' suicide attempt with three children by poisoning food | धक्कादायक ! अन्नात विष कालवून ३ मुलांसह मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक ! अन्नात विष कालवून ३ मुलांसह मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगोली : शहरातील आजम कॉलनी भागात कौटुंबिक वादातून जेवणात मुंग्या मारण्याचे औषध घालून तीन मुलांसह मातेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच रूग्णालयात दाखल केल्याने सर्वजण धोक्याबाहेर आहेत.  

आजम कॉलनी भागातील अनिता जगताप यांचे पतीशी नेहमीच खटके उडायचे. आर्थिक विवंचनेतूनही अनेकदा वाद होत असत. बुधवारी अशाच कौटुंबिक वादातून अनितासह मुलेही नैराश्यग्रस्त बनले होते. यातूनच सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न झाला. यासाठी जेवणात मुंग्या मारण्यासाठी मिळणारा खडू आणुन तो जेवणात कालवला. यामुळे सर्वांनाच विषबाधा झाली. उलट्या व इतर त्रास होत असल्याने आजूबाजूच्या काही जणांनी त्यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. पैसे संपल्याने तेथून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात मध्यरात्री हलविण्यात आले. जिल्हा रूग्णालयात अनिता जगताप (४०), वैष्णवी जगताप (१७), साईनाथ जगताप (१४), अनिकेत जगताप (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Shocking! Mothers' suicide attempt with three children by poisoning food