धक्कादायक ! पतीचा खून करून मृतदेह शेतात जाळला; पत्नी आणि दोन मुलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 16:02 IST2021-12-02T16:02:13+5:302021-12-02T16:02:46+5:30
Murder In HIngoli : पतीने परस्पर जमीन विकल्याने वाद विकोपाला गेले

धक्कादायक ! पतीचा खून करून मृतदेह शेतात जाळला; पत्नी आणि दोन मुलांना अटक
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : घरगुती वाद शिगेला जाऊन पत्नी आणि मुलांनी पतीचा खून केल्याची घटना बाळापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेलमंडळ येथे आज उघडकीस ( Murder In Hingoli ) आली. धक्कादायक म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी आणि दोन मुलांनी खून केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. ( Wife and Two children killes man in Hingoli )
शेतकरी असलेले अवधूत लक्ष्मणराव मुधोळ हे कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे पत्नी अन्नपूर्णा आणि लक्ष्मण व ओंकार या दोन मुलांसह राहतात. अवधूत आणि त्यांची पत्नी व मुलांमध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणातून वाद होते. दरम्यान, अवधूत यांनी परस्पर शेती विकल्याच्या कारणावरून पत्नी आणि मुलांमध्ये खटके उडून वाद विकोपाला गेला. यातूनच बुधवारी रात्री पत्नी आणि दोन्ही मुलांनी मारहाण करून अवधूत यांचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला.
शेतात मृतदेह जाळल्याचे शेजारील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे खुनाच्या घटनेला वाचा फुटली. याची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपी पत्नी अन्नपूर्णा मुधोळ, मुलगा लक्ष्मण व ओंकार यांना अटक केली आहे. खून केल्यानंतर तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते अशी माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली.