धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर अल्पवयीन गतिमंद मुलाचा अत्याचार
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 11, 2023 13:03 IST2023-08-11T13:02:43+5:302023-08-11T13:03:09+5:30
प्राथमिक तपासात अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा गतिमंद असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर अल्पवयीन गतिमंद मुलाचा अत्याचार
हिंगोली : तुझी उजळणी चुकली आहे, तुला उजळणी शिकवतो, असे म्हणून एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर १६ वर्षीय मुलाने अत्याचार केला. ही घटना घटना कळमनुरी तालुक्यात १० ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता घडली. यातील अल्पवयीन आरोपी गतिमंद असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज.येथे १० ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता एक सात वर्षीय अल्पवयीन मुलगी जिल्हा परिषद शाळेजवळ खेळत होती. याच वेळी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने तिस तुला उजवळणी शिकवतो, तुझी उजळणी चुकली असे म्हणून तिच्यावर अत्याचार केला. त्रास होत असल्याने हा प्रकार तिने घरी सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा गतिमंद असल्याचे समोर आले आहे. तसे त्याचेकडे प्रमाणपत्रही असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या अनुषंगाने महिला पोलिस उपनिरीक्षक गजभारे पुढील तपास करीत आहेत.