शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात खळबळ; मुख्याध्यापक ४० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 16:36 IST

एसीबीने शाळेच्या आवारातच ही कारवाई केली. 

- इस्माईल जहागिरदारवसमत: पूर्णा सहकारी साखर कारखाना वसाहत येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी ३ वाजता रंगेहात पकडले. भगवान लहाने असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून एसीबीने शाळेच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली. 

वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना वसाहतीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात तक्रारदार हे अनुकंपावर नोकरीवर आहेत. त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यासाठी मुख्याध्यापक भगवान लहाने यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने पडताळणी करून आज शाळेच्या परिसरात सापळा लावला. 

दुपारी ३ वाजेदरम्यान मुख्याध्यापक भगवान लहाने यास विद्यालयाच्या परिसरात ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. मुख्याध्यापक लहाने चतुर्भुज होताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सुळीकर तसेच इतर कर्मचारी उशिरापर्यंत मुख्याध्यापकाची चौकशी करत होते.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागHingoliहिंगोलीEducationशिक्षणTeacherशिक्षक