शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

'हिंदू बांधवांनो' शब्द टाळल्याने टीका; पलटवार करत उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 17:19 IST

भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेला उद्धव यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे.

Shivsena Uddhav Thackeray Speech ( Marathi News ) : विरोधकांच्या इंडिया आघाडीची सभा काल राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पार पडली. या सभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मात्र उद्धव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' अशी न करता 'माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो' अशी केली. या मुद्द्यावरून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेला उद्धव यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

"मी काल माझ्या भाषणाची सुरुवात 'माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो' अशी केल्यावर मोदीभक्तांनी माझ्यावर टीका केली. मला मोदीभक्तांना विचारायचंय, तुम्ही 'देशभक्त' नाही का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्लाही चढवला आहे.

"शिवसेनेचं प्रेम आणि मिंध्यांचं भाडोत्री प्रेम यात जमीन आस्मानाचा फरक आहे. शिवसेना हा एक निखारा आहे. शिवसेना कळणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही. भाजपला घरफोडीचं एक लायसन्स द्या, आणि पक्ष चिन्ह कमळ सोडून हातोडा द्या," असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता अच्छे दिन नाही, सच्चे दिन येणार, असा टोलाही त्यांना भाजपला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हणाले होते बावनकुळे?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. "आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही," अशी टीका बावनकुळे यांनी केली होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMumbaiमुंबई