इंधन दरवाढीविरोधात हिंगोलीत शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 16:45 IST2021-02-05T16:45:02+5:302021-02-05T16:45:37+5:30
पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा

इंधन दरवाढीविरोधात हिंगोलीत शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
हिंगोली : केंद्र सरकारकडून वारंवार इंधन दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना माेठी आर्थिक झळ बसत आहे. वाढत्या दरविराेधात शिवसेनेच्या वतीने ५ फेब्रुवारी राेजी बैलगाडी माेर्चा काढत केंद्र सरकारच्या विरूध घाेषणबाजी करण्यात आली.
सर्वसामान्यांना अगोदरच महागाईने हैराण केले आहे. यात केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसाला वाढविले जात आहेत. यामुळे जनसामान्य नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दराच्या निषेधार्थ हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. संताेष बांगर, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, सभापती फकीरराव मुंडे, जि.प. सदस्य बाळासाहेब मगर, अंकुश आहेर, श्रीशैल्य स्वामी, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, डॉ. रमेश शिंदे, सुभाष बांगर, राम कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, डी. के. दुर्गे, संदेश देशमुख, भानुदास जाधव, राम मूळे, अनिल देशमुख, गुड्डू बांगर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, साहेबराव देशमुख, आनंदराव जगताप, कानबाराव गरड, अशोक नाईक, संतोष सारडा, अनिल देव, गोपू पाटील, शेषेराव पाटील, विजय बोंढारे, सोपान बोंढारे, मयूर शिंदे, अप्पाराव शिंदे, दादाराव डुरे, सुहास पाटील, राजू संगेकर, बाळू पारवे, अतुल बुर्से, संभाजीराव कऱ्हाळे, संगीता चव्हाण, प्रियंका खरात, सुनिता श्रंगारे, सुशीला आठवले, उषा जाधव, उमा गीते, छत्रु पाटील, दिलीप कल्याणकर, शिवराज पाटील, आयाज पठाण, अनिल भोरे, अनिल बुर्से, गणेश कुरवाडे, शंकर यादव, बंडू पाटील, राजू कऱ्हाळे, बाबासाहेब पोले, लखन शिंदे, सतीश यादव, संतोष पानबुडे, नागेश शिरसागर, राजू वाकोडे, गणेश शिंदे, गजानन पवार, सचिन राठोड, कपिल खंदारे, राहुल दंतवार, प्रदीप कनकुटे, माधव गोरे, प्रशांत पायगन, मनोज देशमुख, वैभव विखे, साई गोरे, धूपर गोरे, प्रदुम्न नागरे, शिवम नाईक, तय्यब पठाण, बाबुराव सुकळकर, दिगंबर बोकसे, अविनाश बोकसे, सचिन पेंढारकर यांच्यासह हजारोच्या संख्येने शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.