शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

सेनगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 7:12 PM

१८ संचालकांपैकी केवळ ७ संचालकच उरल्याने शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश

हिंगोली : सेनगाव बाजार समितीत राजीनामे, अपात्रतेची कारवाई व निधनामुळे १८ संचालकांपैकी केवळ ७ संचालकच उरल्याने शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्याचा आदेश १२ सप्टेंबर रोजी दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणावर यामुळे पडदा पडला आहे. 

सेनगाव बाजार समितीत विद्यमान आ.तान्हाजी मुटकुळे व माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटातील संचालक सत्तेत होते. मात्र आपसी गटबाजी झाली. पदाधिकारी निवडीच्या नाराजीतून राजकारणाने पराकोटीचा स्तर गाठला. अविश्वासनाट्य झाले. त्यानंतर संचालक राजीनाम्यांचा प्रकार झाला. त्यामुळे ही बाजार समिती बरखास्त होणार असल्याच्या वावड्या उठत होते. या वावड्या आज वास्तवातच उतरल्या आहेत. या आदेशात म्हटले की, या बाजार समितीच्या ९ सदस्यांनी राजीनामे दिले. एक अपात्र ठरला तर एकाचे निधन झाले. त्यामुळे १८ पैकी ७ संचालकच उरले आहेत. गळालेल्यांमध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातील आहेत.

मात्र शासनाच्या नव्या धोरणात या मतदारसंघातून सदस्य निवडून देण्याची तरतूदच वगळली आहे. केवळ सात संचालकांवर बाजार समितीचे कामकाज पार पाडण्यास ते असमर्थ ठरत आहेत. या ठिकाणी संचालकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाल्याने सदर पदे नामनिर्देशनाने भरणे उचित होणार नाही. त्यामुळे बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेणे योग्य होईल, अशी शासनाची खात्री झाल्याचेही आदेशात म्हटले आहे.

या बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा देणाऱ्यांत अमोल चंद्रकांत हराळ, गिरीधारी तोष्णीवाल, शंकरराव बोरुडे, श्रीकांत कोटकर, सुमित्रा नरवाडे, द्वारकदास सारडा, गोदावरी शिंदे, गोपाळराव देशमुख, संजय देशमुख यांचा समावेश आहे. तर सजेर्राव पोले हे मयत झाले होते. सदाशिव सोनटक्के अपात्र झाले आहेत. तर सध्या पदावर असलेल्यांमध्ये सभापती डॉ. नीळकंठ गडदे, उपसभापती इंदुमती देशमुख, विनायक देशमुख, आयाजी पाटील, छाया पोले, दत्तराव टाले, संतोष इंगोले यांचा समावेश असला तरीही नव्या निर्णयाने त्यांचीही पदे बरखास्त झाली आहेत.

टॅग्स :MarketबाजारHingoliहिंगोलीFarmerशेतकरी