हिंगोली जिल्हा : शेतीविषयक लाभ, कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम
हिंगोली: नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) अंतर्गत जिल्ह्यातील २४० गावांमध्ये शासनाच्या धोरणानुसार कृषी विभागाच्या वतीने २०१८ पासून आजतागायत जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे.
कोरोना काळात तर शेतकऱ्यांना बाहेर पडणे मुश्कील होऊन बसले होते. अशावेळेस कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसे पाहिले बहुतांश योजना या ऑनलाईनच झालेल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे आणि यापुढेही घेण्यात येईल, असे कृषी विभागाचे धोरण आहे. कोरोना २०१८ पासून आजपर्यत जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत केली आहे. यामध्ये ६ नाडेफ, १३ विहिरींचे वाटप, २ हजार ४७३ पीव्हीसी पाईप, २०० फळबाग, २ हजार २९५ स्प्रींक्लर, १ हजार ७८२ पाण्यातील मोटारी आदींचा समावेश आहे. जवळपास २६ कोटी रुपयांचा लाभ जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ५१ गावे असून पहिल्या टप्प्यात २१, दुसऱ्या टप्यात २६ तर तिसऱ्या टप्प्यात ४. कळमनुरी तालुक्यात ४६ गावे असून पहिल्या टप्प्यात १, दुसऱ्या टप्प्यात २३ तर तिसऱ्या टप्प्यात २२, वसमत तालुक्यात ४६ गावे असून दुसऱ्या टप्प्यात ३६ तर तिसऱ्या टप्प्यात १५, औंढा तालुक्यात ४७ गावे असून पहिल्या टप्प्यात ६, दुसऱ्या टप्प्यात २६ तर तिसऱ्या टप्प्यात २१, सेनगाव तालुक्यात ५० गावे असून पहिल्या टप्प्यात ११, दुसऱ्या टप्प्यात १८ तर तिसऱ्या टप्प्यात १०, एकंदर २४० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ३९, दुसऱ्या टप्प्यात १२९ तर तिसऱ्या टप्प्यात ७२ अशी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांची आकडेवारी आहे.
प्रतिक्रिया
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे. तसेच शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे हे कृषी विभागाचे धोरण आहे.
- बळीराम कच्छवे, उपविभागीय कृषी अधिकारी, हिंगोली.