सात महिन्यांपासून मुलीचा शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:32 IST2018-08-24T00:32:05+5:302018-08-24T00:32:24+5:30

येथील हनुमान नगर मधील एका अल्पवयीन मुलीस गल्लीतील शेजारच्या मुलाने फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरीही सदर मुलीचा सात महिन्यानंतरही शोध लागलेला नाही.

 Search for a girl from seven months | सात महिन्यांपासून मुलीचा शोध लागेना

सात महिन्यांपासून मुलीचा शोध लागेना

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : येथील हनुमान नगर मधील एका अल्पवयीन मुलीस गल्लीतील शेजारच्या मुलाने फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरीही सदर मुलीचा सात महिन्यानंतरही शोध लागलेला नाही.
आखाडा बाळापूर येथील हनुमान नगर येथील एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस १६ जानेवारी २०१८ रोजी शेजारच्या दिनेश संतोष इंगळे या तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. सदर मुलीस आरोपी गेल्या एक वर्षापासून मुलीच्या पाठीमागे होता व तिला त्रास देत होता, अशी तक्रार मुलीच्या पित्याने दिल्यानंतर बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर करीत आहेत. सात महिन्यांनंतरही सदर मुलीचा शोध लागला नसल्यामुळे शोध कामे व मुलीचे वर्णन पोलिसांना पाठविल्याची माहिती बोधनकर यांनी दिली आहे.

Web Title:  Search for a girl from seven months