एबीएम इंग्लिश हायस्कूलमध्ये ८ रोजी विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:35+5:302021-02-06T04:54:35+5:30
या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शिक्षणाधिकारी परसराम पावसे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. ज. मु. मंत्री, ...

एबीएम इंग्लिश हायस्कूलमध्ये ८ रोजी विज्ञान प्रदर्शन
या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शिक्षणाधिकारी परसराम पावसे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. ज. मु. मंत्री, शिवाजी पवार, प्रा. किशोर बोथरा, त्रिंबक केंद्रे, एबीएम समूह अध्यक्ष दिलीप बांगर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनामध्ये मॉडेल मेकिंग, पोस्टर मेकिंग व क्वीझ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांना तथा विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
याप्रसंगी रवींद्र धायतडक, सहायक धर्मादाय आयुक्त संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्रा.), शिवाजी पवार, शिक्षणाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल.
या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी शाळेचे संकेतस्थळ http://www.abmenglishschool.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसह सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य जोसेफ के.जे., अनिता अनदन, विजय वसू, सचिन डोईफोडे यांनी केले आहे