शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

‘जलयुक्त’ला वाळूचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:59 IST

जिल्ह्यात वाळूच्या घाटांचा लिलाव होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधाऱ्यांची कामे रखडून पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात वाळूच्या घाटांचा लिलाव होत नसल्याने जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधाऱ्यांची कामे रखडून पडली आहेत. त्यासाठी वारंवार मुदतवाढ मागितली जात आहे. तर आता थेट मंत्रालयातूनच वाळू उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाºयांना पत्र आले आहे.हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतील चालू वर्षातील कामांचा पत्ता नाही. तर मागील वर्षीची कामेही वाळूअभावी रखडून पडली आहेत. त्यामुळे निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतील कामांची ही परिस्थिती असेल तर इतर कामांचा काही विचारच न केलेला बरा. विशेष म्हणजे आता शासकीय कामे ठप्प अन् खाजगी कामे जोरात आल्याचे चित्र आहे. शासकीय कामांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन-प्रशासनाने मार्ग काढणे गरजेचे आहे.हिंगोली उपविभागात जलसंधारण विभागातर्फे २0१७-१८ च्या मंजूर आराखड्यातील नाला खोलीकरणाची १७८ पैकी १७५ कामे पूर्ण झाली आहेत. ३ कामे अपूर्ण आहेत. तर सिमेंट नाला बांधाची ४१ पैकी केवळ १0 कामेच पूर्ण झाली. २३ कामे सुरू आहेत. ८ कामे तर वाळू घाटांचा लिलाव न झाल्याने सुरूच करता आली नाहीत. ही कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २0१९ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे या विभागाकडून करण्यात आली आहे.तर जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही जिल्हाधिकाºयांना पत्र दिले आहे. त्यात सिंचन अनुशेष व जलयुक्त शिवार योजनेतील कामे राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले आहे. त्याचबरोबर रोहयो विभागानेही जिल्हा खनिकर्म अधिकाºयांना पत्र देवून या कामांसाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी कळविले आहे. वाळू नसल्याने ९.८३ कोटी रुपयांची कामे अडकून पडली आहेत. तर जलयुक्तचीही कोट्यवधीची कामे अपूर्ण आहेत. आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते? याकडे लक्ष लागले आहे. दिवसेंदिवस वाळूचा प्रश्न गंभीर होत चालला असून कामे प्रभावित होत आहेत.वाळूघाटाच्या लिलावासंदर्भात जिल्हा खनिकर्म विभागाने मागील महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. त्याची निविदाही प्रसिद्ध केली होती. मात्र ऐनवेळी पुन्हा हा प्रश्न हरित लवादाकडे गेल्याने त्याला स्थगिती द्यावी लागली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना हा प्रकार घडला.१४ जानेवारीला शासन यावर आपले म्हणने सादर करणार आहे. त्यानंतर लिलावाचा मार्ग मोकळा होणार की हा प्रश्न असाच चिघळणार हे स्पष्ट होणार आहे. तूर्त तरी या प्रश्नावर निर्णय होईपर्यंत पत्रव्यवहाराच चालणार असल्याचे दिसते.जिल्ह्यात काही ठिकाणी दगडापासून मशिनद्वारे बनविलेल्या वाळूचा वापर आता सुरू झाला आहे. त्यामुळे योग्य तांत्रिक सल्ला घेवून असा पर्याय निवडल्यास इतर कामेही करणे शक्य होणार असल्याचे दिसते.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीgovernment schemeसरकारी योजना