पशुधनाची कवडीमोलदराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:38 IST2019-01-21T00:37:59+5:302019-01-21T00:38:22+5:30
यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. जवळा बाजार येथील आठवडी जनावरांच्या बाजारात लहाणमोठी ७०० च्या आसपास जनावरे रविवारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती. ऐरवी ७० ते ८० हजाहरांना विक्री होणारी बैलजोडी रविवारी ३० ते ४० हजारांना विक्री होत होती.

पशुधनाची कवडीमोलदराने विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. जवळा बाजार येथील आठवडी जनावरांच्या बाजारात लहाणमोठी ७०० च्या आसपास जनावरे रविवारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती. ऐरवी ७० ते ८० हजाहरांना विक्री होणारी बैलजोडी रविवारी ३० ते ४० हजारांना विक्री होत होती.
अत्यल्प पावसामुळे खरिपासह रबी हंगामही हातचा गेला. चारा पिकांची पेरणी करुनही पावसाअभावी उगवण झालीच नाही. त्यामुळे पशुपालकांकडे चाराच उपलब्ध नाही. हिवाळ्यातच चारा-पाण्याअभावी जनावरांची हेळसांड होत आहे. हे चित्र उन्हाळ्यात अधिक भयंकर होण्याचे चिन्हे दिसत असल्याने पशुपालकांनी जनावरे विक्री करणेच पसंद केले. मुलाबाळांप्रमाणे सांभाळ केलेल्या जनावरांची कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ आज शेतकºयावर आली आहे. येथील आठवडी बाजारात जनावरे खरेदीसाठी पशुपालक तुरळक हजेरी लावत होते. तर व्यापाºयांची संख्या जास्त होती. सद्यस्थितीत जनावरांचा सांभाळ करणे कठीण झाल्याचे पशुपालक सांगत होते. ज्या दावणीला आठ ते दहा जनावरे बांधलेली असत तेथे आता एक ते दोन जनावरे आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी चारा पिकांची पेरणी केली. सध्या सर्वच जलस्त्रोत आटल्याने ती पिकेही वाळून गेली आहेत.
जवळा बाजार येथील जनावरांच्या बाजारात रविवारी ३५० बैलजोड्या, १४० म्हैस, २०० शेळ्या आणि ५० ते ६० गाई विक्रीसाठी पशुपालकांनी आणल्या होत्या. दुष्काळाने बाजारात जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. नेहमीपेक्षा जास्त संख्येने जनावरांची संख्या २० जानेवारी रोजी दिसून आली.