धावत्या बसला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:34 IST2018-10-20T00:34:18+5:302018-10-20T00:34:50+5:30
वसमत तालुक्यातील हट्टा ते जिरो फाटा येथे पाटील महाविद्यालयासमोर चालत्या बसला आग लागली. ही बस पंढरपूरहून मंगळुरपीरकडे जात होती.

धावत्या बसला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा ते जिरो फाटा येथे पाटील महाविद्यालयासमोर चालत्या बसला आग लागली. ही बस पंढरपूरहून मंगळुरपीरकडे जात होती. बसला आग लागल्याने अचानक इंजिन जवळील वायरिंग जळाली. व इंजिनचे चेंबर फुटल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे भयभीत होऊन बसमधील प्रवासी खाली उतरले. हा प्रकार बसचालकालाही लवकर समजला नाही. यावेळी बसमधील एका प्रवाशाने परभणी पालिकेच्या अग्निशमन दलास दुरध्वनीवरून संवाद साधला. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. ही बस पंढरपूर मंगरूळपीर असून बसचा क्रमांक एमएच -४० वाय ५५६६ असा आहे. या घटनेमुळे मात्र प्रवासी भयभीत झाले होते.