शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

हिंगोली जिल्ह्यातील २६३१ शिक्षक - कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:56 IST

हिंगोली जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू  होणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना पत्र

हिंगोली : नववी ते बारावी तसेच महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माध्यमिक विभागाकडून जवळपास २८३७ शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र आदेश काढून विविध सूचना दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू  होणार आहेत. त्यासाठी तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरटीपीसीआर चाचण्यांसाठी स्वॅब घेण्यास आदेशित केले. १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ही चाचणी करून घ्यायची आहे. माध्यमिकच्या २२७० तर उच्च माध्यमिकच्या ३६१ जणांची चाचणी करण्यात येणार आहे.

२१४ माध्यमिक शाळाहिंगोली जिल्ह्यात माध्यमिकच्या शाळांची एकूण संख्या २१४ एवढी आहे. यात अनुदानित शाळा ९२, विनाअनुदानित शाळा २३, अंशत: अनुदानित शळा १५, स्वयंअर्थसहायित शाळा ३२, जिल्हा परिषदेच्या शाळा २९ आहेत. तर जवाहर नवोदय विद्यालय व सैनिकी शाळाही प्रत्येकी १ आहे.  याशिवाय आश्रमशाळाही २१ असून या ठिकाणच्या शिक्षक कर्मचाऱ्यांची चाचणी होईल.

उच्च माध्यमिकच्या अवघ्या ११२ शाळाहिंगोली जिल्ह्यात उच्च माध्यमिकच्या अवघ्या ११२ शाळा आहेत. त्यातही अनुदानित १९, विनाअनुदानित ८४, स्वयंअर्थसहायित ७ तर २ आश्रमशाळा आहेत. अंशत:  अनुदानित, जिल्हा परिषदेची शाळा नाही. तर जवाहर नवोदय व सैनिकी शाळेतही उच्च माध्यमिक नाहीत. यांचे एकूण ३६१ शिक्षक व कर्मचारी हजर राहतील.

अशी आहे विद्यार्थी संख्याहिंगोली जिल्ह्यात माध्यमिकचे नववी ते दहावीचे एकूण विद्यार्थी ३८ हजार ९२६ आहेत. यात मुले २०४१५ तर मुली १८५११ आहेत. यातील शासकीय ६३५, जि.प.चे ४२९४, खाजगी अनुदानित २९५५५, खाजगी विनाअनुदानित १९१३, स्वयंअर्थसहायित २५२९ आहेत. तर ११ वी १२ वीचे २७ हजार ४४ आहेत. यात मुले १४५२७ तर मुली १२५१७ एवढ्या आहेत.

पालकांची संमती आवश्यकहिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्याचप्रमाणे मुलांनाही शाळेत पाठविण्यापूर्वी पालकाची लेखी संमती घेणे आवश्यक केले आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत पुन्हा आदेश काढले आहेत. संबंधित यंत्रणांनी यावर अंमल करून घ्यायचा आहे.

कोरोनाविषयक काळजी घेण्याच्या सूचनाहिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू करण्यासाठी सर्व संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. सॅनिटायझर व इतर बाबी स्थानिक प्रशासन देणार आहे. त्यामुळे काही शाळांनी मांडलेली ही समस्याही दूर झाली आहे, असे शिक्षणाधिकारी पी.बी.पावसे म्हणाले.

आजारींनी येवू नयेशाळा सुरू झाल्यावर मुलांची चाचणी होणार नाही. त्यामुळे आजारी मुलांनी शाळेत येवू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे याकडे लक्ष ठेवावे लागेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीTeacherशिक्षक