शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आरटीईतही दुहेरी शुल्क घेणार्‍या शाळांची चौकशी गुलदस्त्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 7:40 PM

शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशात विद्यार्थ्यांकडून दुहेरी शुल्क घेणार्‍या शाळांसह यात प्रवेश नाकारणार्‍या शाळांचे प्रकरण जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजले होते.

हिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेशात विद्यार्थ्यांकडून दुहेरी शुल्क घेणार्‍या शाळांसह यात प्रवेश नाकारणार्‍या शाळांचे प्रकरण जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाजले होते. मात्र आठ महिन्यांपासून त्याचा अहवालच अजून शिक्षण विभागात दडून बसला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील काही शाळांनी २५ टक्के मोफत प्रवेशाची रक्कम शासनाकडून मिळत नसल्याने पालकांकडून ती घेतली होती. तर शासनाने शुल्क दिल्यानंतर ती परत केली जाईल, असे सांगूनही ती परत न केल्याने काही पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. याबाबत काही पालक जि.प. सदस्यांकडेही गेले होते. त्यानंतर जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल यांनी हा मुद्दा शिक्षण समितीसह सर्वसाधारण सभेतही मांडला होता. यावरून संबंधित शाळांची चौकशी करून गटशिक्षणाधिकार्‍यांनी अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले होते. यात वसमत, कळमनुरी व सेनगावचा अहवाल आल्याचे सांगण्यात आले. मात्र आधीच विलंबाने आलेला हिंगोली पं.स.चा अहवाल अजूनही दाबूनच ठेवलेला असल्याचे आज चौतमल यांनी शिक्षणाधिकार्‍यांसमक्ष केलेल्या चौकशीत समोर आले. आता नेमका हाच अहवाल समोर न येण्यामागची कारणे काय? हे शोधण्याची गरज आहे. चौतमल यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करीत गोरगरिबांचे शैक्षणिक शुल्क लाटणार्‍यांवर थेट कारवाई होईपर्यंत हे प्रकरण लावून धरू, असे सांगितले. 

..तर प्रशासकआरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी सक्ती करू नये, अशी याचिका ४१ शाळांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. अशा शाळांबाबत तूर्त कोणताच निर्णय घेवू नये, यात नसलेल्या शाळाही प्रवेश देत नसल्याच्या तक्रारी असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले.त्यामुळे अशा शाळांवर १५ आॅक्टोबर २0१0 च्या शासन निर्णयान्वये प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश संचालक सुनील चौहान यांनी दिला. हिंगोलीतील एबीएम इंग्लिश स्कूल ही एकमेव याचिकाकर्ता शाळा असल्याने तिला यात दिलासा आहे.

ती शाळा कोणती?संचालनालयाने दिलेल्या यादीत केवळ एकच शाळा हिंगोली जिल्ह्यातील असेल तर या नावाखाली प्रवेश नाकारणारी दुसरी शाळा कोणती? तिच्यावर प्रशासक नियुक्तीचा प्रस्ताव जाईल का? हा प्रश्न आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षकeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र