कुरुंदा येथे रोहित्राला अचानक लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:59 IST2018-10-18T23:59:20+5:302018-10-18T23:59:36+5:30
येथील गणेश नगर भागातील चोंडी रस्त्यावर असलेल्या रोहित्राला अचानक आग लागल्याने रोहित्राची वायरिंग जळाली आहेत. त्यामुळे गणेशनगर भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

कुरुंदा येथे रोहित्राला अचानक लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : येथील गणेश नगर भागातील चोंडी रस्त्यावर असलेल्या रोहित्राला अचानक आग लागल्याने रोहित्राची वायरिंग जळाली आहेत. त्यामुळे गणेशनगर भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
येथील कुरुंदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा बाजूस असलेल्या रोहित्रामधील बिघाडामुळे आग लागली. त्यात संपूर्ण वायरिंग जळाली होती.
ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. डीपीला आचानक लागलेली आग पसरू लागल्याने वेळीच विद्युत कंपनीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. परंतु वायरिंग जळाल्याने गणेशनगर भागातील वीजपुरवठा खंडित झालेला होता. त्यामुळे त्या भागात अंधार पसरलेला पाहण्यास मिळाले.