Ringing movement in Hingoli | हिंगोलीत घंटानाद धरणे आंदोलन
हिंगोलीत घंटानाद धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेरीट बचाओ देश बचाओ जिल्हा समन्वय समितीच्या वतीने घंटानाद धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत समतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
जिल्हा समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरिब शोषित समाज हा सर्व जाती व धार्ममध्ये आहे. परंतु सवर्ण आहे म्हणून त्याला कोणत्याही सवली मिळत नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे हा समाज असंघटीत आहे. राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी आरक्षण मुद्याचा फायदा उचलत आहेत. परंतु यामध्ये ३८ टक्के समाज हा सामाजिक समतेच्या प्रवाहात मागे पडत आहे. त्यामुळे याची प्रशासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Web Title:  Ringing movement in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.