अपात्र स्वच्छता निरीक्षकांना संवर्ग समावेशनाची पुन्हा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST2021-07-09T04:19:49+5:302021-07-09T04:19:49+5:30
राज्यात कार्यरत स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांतून संवर्ग समावेशनासाठी एकूण ३८९ कर्मचारी इच्छुक होते. यापैकी १४४ जणांना शासनाने स्वच्छता निरीक्षक ...

अपात्र स्वच्छता निरीक्षकांना संवर्ग समावेशनाची पुन्हा संधी
राज्यात कार्यरत स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांतून संवर्ग समावेशनासाठी एकूण ३८९ कर्मचारी इच्छुक होते. यापैकी १४४ जणांना शासनाने स्वच्छता निरीक्षक म्हणून संवर्ग सेवेत समावेशित केले होते. तर उरलेल्या २४५ कर्मचाऱ्यांना विविध किरकोळ कारणांनी समावेशनापासून वंचित ठेवल्याची भवना कर्मचाऱ्यांत निर्माण झाली होती. या अपात्र कर्मचाऱ्यांमध्ये काहींना एमएससीआयटी, जात पडताळणी, स्वच्छता निरीक्षक पदाची पदवी अशी कागदपत्रे वेळेत दाखल न करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा कागदपत्रे सादर करण्यासाठी संधी देण्याची मागणी न.प., न.पं. संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्ही.डी. घुगे यांनी एका निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार नगररचना आयुक्त तथा संचालकांनी संवर्ग समावेशन समितीपुढे संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव ठेवून ३१ मार्च २०२१ पर्यंत ज्यांनी सदरील अपात्र कारणांची पूर्तता केली असल्यास त्यांना स्वच्छता निरीक्षक म्हणून एक वेळा पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे.