राकाँ जिल्हाध्यक्षपद; पुन्हा वाढले इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:41 IST2018-04-24T00:41:34+5:302018-04-24T00:41:34+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु मध्येच त्यात व्यत्यय आला होता. पूर्वी फक्त चारच इच्छुक होते. आता ती संख्या आठवर गेली आहे.

राकाँ जिल्हाध्यक्षपद; पुन्हा वाढले इच्छुक
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु मध्येच त्यात व्यत्यय आला होता. पूर्वी फक्त चारच इच्छुक होते. आता ती संख्या आठवर गेली आहे.
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्याची इतकी संथ गती आहे की, मागील तीन महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष निवड करणे शक्य झाले नाही. यापूर्वीही त्याची चर्चा झाली होती. त्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.सदस्य मनीष आखरे व संजय कावरखे यांनी इच्छा प्रकट केली होती. काल पुन्हा चर्चा झाली अन् नव्याने डॉ.जयदीप देशमुख, जगजित खुराणा, बी.डी.बांगर, राजू पाटील यांनीही मुलाखत दिली. अॅड.मोहंमद खॉं पठाण हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आले होते.
..तर लोकसभाही लढवेल-वडकुते
मागील काही दिवसांपासून हिंगोली मतदारसंघात प्रचारकी थाटात फिरणाऱ्या आ.रामराव वडकुते यांना ही जागा काँग्रेसला असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मागच्यावेळी आम्ही लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली होती. आता ती मागू. तर आघाडी न झाल्यास लोकसभेची जागा लढविण्याची तयारी असल्याचेही सांगितले.