शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

टीसी असल्याचे भासवत प्रवाशांना लुटणारा भामटा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

By रमेश वाबळे | Updated: February 5, 2025 19:32 IST

एकजण टीसी असल्याचे भासवत हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे तिकीट तपासणी करीत होता. 

हिंगोली : टीसी असल्याचे भासवत प्रवाशांचे तिकीट तपासणीसह पैसे उकळणाऱ्या एका भामट्यास प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर घडला. दिनेश गोविंद महाडिक (रा.क्यू.नो.४०२ के. टाईप,  अगवालीचाल भुसावळ, जळगाव) असे भामट्याचे नाव आहे.

अलीकडच्या काळात रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. या प्रकारास आळा घालण्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने उपाययोजना आखण्यात येत असून, त्यांतर्गत रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी, तसेच रेल्वेतून उतरलेल्या काही प्रवाशांची स्थानकावरही तिकीट तपासणी करण्यात येते. ५ फेब्रुवारी रोजी एकजण टीसी असल्याचे भासवत हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे तिकीट तपासणी करीत होता. 

यादरम्यान, काही जणांकडून तो पैसेही उकळत असल्याचा प्रकार काही प्रवाशांच्या लक्षात आला. शिवाय भामट्याच्या गळ्यातील ओळखपत्रही बनावट असल्याचा संशय बळावल्याने प्रवाशांनी त्यास रेल्वे पोलिसांच्या हवाली केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करीत ओळखपत्र तपासले असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. भामटा दिनेश गोविंद महाडिक यास ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदविणार असल्याचेही रेल्वेसुत्रांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे