सीईओंसमोर मांडले शिक्षकांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:40 AM2018-06-10T00:40:32+5:302018-06-10T00:40:32+5:30

सार्वत्रिक बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोलीच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

 The question of teachers presented before the CEO | सीईओंसमोर मांडले शिक्षकांचे प्रश्न

सीईओंसमोर मांडले शिक्षकांचे प्रश्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सार्वत्रिक बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोलीच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शिक्षकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पात्र शिक्षकांना तत्काळ माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व प्राथमिक पदविधर या पदावर नियमानुसार पदोन्नती द्यावी, विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देताना त्यांचा पसंतीक्रम लक्षात घ्यावा, लातूर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली झालेले सर्व शिक्षक विस्थापित झाले आहेत. त्यांचीही समस्या सोडवावी, शासन निर्णयानुसार माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात, जेणेकरुन प्रत्येक माध्यमिक शाळेतील विषयनिहाय शिक्षक मिळण्यास मदत होईल. तर वर्षभर चालविलेल्या हंगामी निवासी वसतिगृहाची देयकेही अद्याप प्रलंबित आहेत. ती वेळीच वितरित करण्यात यावीत, पुढील वर्षी हंगामी निवासी वसतिगृह सुरु करण्यापूर्वी अग्रीम रक्कम शाळांच्या खात्यावर जमा करावी, वसतिगृह सुरु करण्याचे आदेश द्यावेत. विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीची रक्कम बँक खात्यावर जमा करतानाही अनेक अडचणी येत आहेत, अशा विविध मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी दिले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष व्ही. डी. देशमुख, सरचिटणीस डी. एस. कोल्हे, कार्याध्यक्ष जी. एस. खिल्लारी, जी. एस. इंगोले, आर. जी. पानपट्टे, एल. एन. वाव्हळ, एम. ए. पठाण, बी. एस. मात्रे, बी. बी. भगत, एस. एस. बेंगाळ, गजानन इंगोले, एस. के. मुधोळ आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title:  The question of teachers presented before the CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.