शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

हिंगोली जिल्ह्यात घरकुलांच्या प्रलंबित कामांचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 19:08 IST

वारंवार सूचना देऊनही उपयोग होईना

ठळक मुद्दे चार हजार कामे रखडली

हिंगोली : जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांतील प्रलंबित कामांचा प्रश्न मागील वर्षभरापासून सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र यंत्रणांची उदासीनता या कामांना गती देत नसल्याचे समोर येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत २0१६ ते २0१९ या काळात ५१८३ घरकुलांचे उद्दिष्ट होते. तर मंजुरी ४९४0 घरकुलांना देण्यात आली होती. यापैकी ४९२५ जणांचे बँक खाते पडताळणीही झाली होती. यात औंढा ८२२, वसमत ९८७, हिंगोली ७३६, कळमनुरी १२८१, सेनगाव १0९७ अशी संख्या होती. मात्र यातील १४ जणांना पहिला हप्ताच मिळाला नाही. उर्वरितांना तो प्रदान केला होता. यापैकी ४४१७ जणांनी कामे पूर्ण केली आहेत. तर ७६६ जणांची कामे अर्धवट आहेत. यात औंढा ९७, वसमत २६४, हिंगोली ९0, कळमनुरी १२६, सेनगाव १८९ अशी संख्या आहे.

याच काळात रमाई घरकुल योजनेत ५७६६ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी ४७७८ कामांना मंजुरी देऊन खातेक्रमांक पडताळणी झाली होती. यात औंढा ६११, वसमत ९७८, हिंगोली ९८९, कळमनुरी ११९४, सेनगाव १0२३ अशी संख्या होती. यापैकी शंभरावर घरकुलांना तर पहिला हप्ताच दिला नाही. दुसऱ्या हप्त्यापर्यंत ३६00 घरकुले पोहोचली होती. यापैकी ३१२२           घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर तब्बल २६४४ घरकुलांचे काम रखडलेले आहे. यात औंढा ४४0, वसमत ३७९, हिंगोली ५९८, कळमनुरी ५८६, सेनगाव ६४१ अशी संख्या आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे लटकलेली असल्याने ग्रामीण भागातून ओरड वाढली आहे. यात अनेक ठिकाणी अभियंत्यांकडून तपासणीच होत नसल्याचीही ओरड आहे. तर काही ठिकाणी पंचायत समितीकडून आॅनलाईन प्रक्रियेत व्यत्यय आणला जात असल्याची बोंब आहे.

पारधी घरकुल योजनेत हिंगोलीत २३, औंढा व कळमनुरीत ३ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यहर्पकु ३१ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर हिंगोलीत ४ कामे बाकी आहेत. शबरी घरकुल योजनेत जिल्ह्याला १४५0 घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी खातेपडताळणीनंतर मंजुरी दिलेले १२८७ कामे होती. यापैकी १२६२ जणांना पहिला हप्ता वितरित केला. यात औंढा २७२, वसमत १२६, हिंगोली ९६, कळमनुरी ६८७, सेनगाव ८१ अशी संख्या आहे. मात्र यापैकी ६९९ कामेच पूर्ण झालेली असून ७५१ कामे लटकलेली आहेत. रखडलेल्या कामांमध्ये औंढा २२0, वसमत४९, हिंगोली १६, कळमनुरी ३८९, सेनगाव ७७ अशी संख्या आहे.

कारवाईची गरज, नाहक अडवणूकही वाढलीएकंदर जिल्ह्यात चार हजारांच्या आसपास कामे अजूनही अपूर्ण आहेत. काही ठिकाणी दिलेल्या उद्दिष्टाएवढी कामेच मंजूर झाली नाहीत. त्यामुळे दोन्ही बाबींचा विचार केला तर हा आकडा त्याहीपुढे जाण्याची शक्यता आहे. ४ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ड यादीतील नावे कधी येणार, हा प्रश्न पडला आहे. तर सामाजिक व आर्थिक गणनेनुसार झालेल्या यादीतील लाभार्थीच अजून संपत नसल्याचे दिसत आहे. रेंगाळलेल्या कामांचा आढावा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी कारवाईचे हत्यार उपसण्याचा इशाराही दिलेला आहे. मात्र तरीही घरकुलांच्या कामांना गती मिळत नसल्याने आता प्रत्यक्ष कारवाईची वेळ येते की काय, असे दिसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी