‘झोपडपट्टीधारकांना घरकुलाचा लाभ द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:33 IST2018-12-03T00:32:35+5:302018-12-03T00:33:11+5:30
शहरातील झोपडपट्टी धारकांची घरे नियमाकुल करून घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

‘झोपडपट्टीधारकांना घरकुलाचा लाभ द्या’
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शहरातील झोपडपट्टी धारकांची घरे नियमाकुल करून घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. वसमत शहरात अनेक वर्षापासून झोपडपट्टीमध्ये नागरिक राहतात. झोपडपट्टींना नियमाधीन करण्याची गरज आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वर्षानुवर्षे राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांची घरे नियमाकुल करून त्यांना घरकुलांचा लाभ घरांची आकारणी करताना सामाजिक आरक्षणानुसार सूट द्यावी, या मागणीसाठी नगरसेवक रविकिरण वाघमारे, नदीम सौदागर हे उपोषणास बसले आहेत. लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.