निषेध आंदोलनाला हिंसक वळण; सेनगावात तहसीलदारांची जीप जाळली, गोदामही पेटवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 18:41 IST2023-09-02T18:40:13+5:302023-09-02T18:41:33+5:30
सकल मराठा समाजाच्यावतीन आज सेनगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

निषेध आंदोलनाला हिंसक वळण; सेनगावात तहसीलदारांची जीप जाळली, गोदामही पेटवलं
सेनगाव: जालना जिल्ह्यात घडलेल्या अमानुष लाठीचार्जच्या घटनेचा आज निषेध करताना सकल मराठा समाजाच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. अज्ञात आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसरात उभी जीपला आग लावली. तसेच तेथून जवळ असलेले गोदामही पेटवून देण्यात आले. कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझाविल्याने पुढील अनर्थ टळला.
सकल मराठा समाजाच्यावतीन आज सेनगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, तहसील प्राणांगणात उभी असलेली प्रशासकीय गाडी जाळण्याची घटना घडली. ही आग सेनगाव अग्निशामक दलाच्या व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने विझवण्यात आली. मात्र, जीप आतून पूर्ण जळून गेली आहे. मात्र, याबाबत तहसील कर्मचाऱ्यांनी गाडी स्पार्किंगमुळे पेटल्याचे सांगितले. याचवेळी तहसील कार्यालय आवारात असलेल्या शासकीय धान्य गोदामाला देखील आग लागली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.