पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:13 IST2018-08-19T00:12:36+5:302018-08-19T00:13:05+5:30

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी १७ आॅगस्ट रोजी काढले. वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत दूरक्षेत्र जवळा बाजार पोलीस चौकीत कार्यरत पोहेकॉ शेख खुद्दूस शेख लाल यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.

 Police personnel suspended | पोलीस कर्मचारी निलंबित

पोलीस कर्मचारी निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी १७ आॅगस्ट रोजी काढले.
वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत दूरक्षेत्र जवळा बाजार पोलीस चौकीत कार्यरत पोहेकॉ शेख खुद्दूस शेख लाल यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी सांगितले. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कर्तव्यात कसूर करणाºयांची गय केली जाणार नाही, असेही योगेशकुमार म्हणाले.

Web Title:  Police personnel suspended