शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

बेवारस सापडलेल्या बाळाला पोलीस दलाची मायेची ऊब, तान्हुल्या बाळाला पाजला पान्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 4:28 AM

१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिंगाेली बसस्थानक परिसरात ३ महिन्यांचा बालक कोणीतरी सोडून गेले. पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी मायेची ऊब दिली. हे तीन महिन्यांचे बाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. 

हिंगोली: खाकी वर्दीतही माणुसकीचा ओलावा असतो याचे प्रत्यंतर येथे आले. बसस्थानकात सापडलेल्या तीन महिन्यांच्या बेवारस बाळाला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, तरीही या बालकाचे रडणे थांबत नव्हते. हे पाहून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपले दूध या बाळाला पाजले आणि त्याचे रडणे थांबविले. या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिंगाेली बसस्थानक परिसरात ३ महिन्यांचा बालक कोणीतरी सोडून गेले. पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी मायेची ऊब दिली. हे तीन महिन्यांचे बाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांना परिस्थितीनुसार कठोर बनावे लागते. त्यासोबत कधी मायेची ऊबही द्यावी लागते, हे शेख या महिला पोलीस कर्मचाऱ्याने बाळाला आपले दूध पाजून दाखवून दिले. यामुळे कोणत्याही धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, हे सिद्ध केले आहे. या बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन हिंगोली पोलिसांनी केले आहे.

माझा जीव कासावीस होऊ लागला...तीन महिन्यांच्या बाळाला जिल्हा सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस ते बाळ रडण्याचे थांबत नव्हते. त्या बाळाला भूक लागली असावी हे केवळ माताच जाणते. मला राहवले नाही. मी क्षणाचाही विचार न करता त्या बाळाला माझे दूध पाजले आणि त्याचे रडणे थांबले. त्यानंतर माझे मन शांत झाले.-सलमा शेख, महिला पोलीस, हिंगोली शहर पोलीस ठाणे.

टॅग्स :PoliceपोलिसHingoliहिंगोली