टेंभूरदरा येथे विष प्रयोगकरून मोरांची शिकार; एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:04 IST2018-03-28T19:04:22+5:302018-03-28T19:04:22+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभूरदरा येथे विष प्रयोगकरून मोरांची शिकार करण्यात आल्याचे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आले.

टेंभूरदरा येथे विष प्रयोगकरून मोरांची शिकार; एकजण ताब्यात
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभूरदरा येथे विष प्रयोगकरून मोरांची शिकार करण्यात आल्याचे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. या प्रकरणी वनाधिकाऱ्यानी एकास ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघे फरार आहेत.
आज सकाळी टेंभूरदरा परिसरात काही व्यक्ती विष प्रयोगकरून मोरांची शिकार करीत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांना समजली. त्यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना तीन लांडोर मृतावस्थेट तर एक अर्धमेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी गोविंदा चव्हाण (रा. पिंपळदरी ) याला ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे अशोक भोसले (रा.सवना) व सचिन भोसले (रा. सवना) हे पळून जाण्यात यशस्वी झाली.
यानंतर अत्यवस्थ लांडोरास जामगव्हाण येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र,काही कालावधीत तेही मरण पावले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कादरी यांनी चारही लांडोराचे शवविच्छेदन केले. या मोहिमेत वनपाल जी.बी. मिसाळ, एस.एस.चव्हाण, एस.बी.चोपडे, पी.ए.खरात, एस.एन. तावडे, नारायण घोंगडे, पी.व्ही.चव्हाण, छत्रपती दीपके, आर.डी. बैराने यांचा सहभाग होता.