वर्गातील प्रत्येक मुलांच्या प्रत्येक विषयाच्या मुलभूत संकल्पना विकसीत करा, राज्यातील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी सहकार्य करा, १०० टक्के मुले प्रगत करा, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले. ...
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ फेब्रुवारी रोजी उपोषण केले. ...
शेततळ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. तर दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यास आदेशित केल्याने कामे न करणाºया इतरांच्या उरातही धडकी भरली आहे. ...
नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थित ...
मोंढ्यामध्ये खरेदी केलेला गहू ट्रकमधून विक्रीसाठी नेत असताना पोलीस प्रशासनाने चौकशी न करताच पकडला. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी संतापले असून या घटनेला विरोध म्हणून मोंढ्यात शेतक-यांकडून गहू खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन ट्रक सुटेपर्यंत मोंढा बंद ठेवण ...
सर्व शिक्षा अभियान, समता कक्ष अंतर्गत शिक्षण विभागातर्फे ६ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहरालगत तसेच ग्रामीण परिसरात शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी पालांवरील शाळाबाह्य आढळुन आलेल्या १५ बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश देण्यात आला. ...
नाफेडच्या हमीभाव केंद्रावर मालाची विक्री करणा-या शेतक-यांची दैना काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. तीन महिने प्रतीक्षा करून निवेदनबाजी, उपोषणे केल्यानंतर हे वाटप तर सुरू झाले मात्र काही सोयाबीन उत्पादकांना अर्धवट रक्कमेचे धनादेश आल्याने त्यांनी ते ...
न.प.तील विषय समित्यांत सदस्यसंख्या ठरवून या सदस्यांची निवड आज करण्यात आली. आता सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये पक्षीय राजकारणातून मोठी ओढाताण होण्याची भीती होती. मात्र अगदी खेळीमेळीत ही निवड प्रक्रिया पार पडली. ...
तालुक्यात गत वर्षीच्या तुलनेत वीज वितरण कंपनीच्या थकबाकीत दुप्पटीने वाढ झाली असून सेनगाव उपविभागात एकूण ४ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी झाली आहे. सदर थकबाकी वसुलीकरीता वीज वितरण कंपनीने वसुली मोहीम तीव्र केली आहे. ...