येथे डेंग्यूसदृश्य आजाराचा रुग्ण आढळला असून वसमत येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ठिकठिकाणी नाल्या दुर्गंधीने तुंब भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून डेंग्यूसदृश्य आजाराचा प् ...
विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला कळशी उचलून देण्याच्या बहाण्याने गावातील एका तरुणाने तिचा विनयभंग केला. सदर बालिकेच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. ...
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून दिली असून २६ एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. ...
मागील दीड महिन्यापासून हिंगोलीकरांना पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यांवर अंधाराचा सामना करावा लागत होता. मंगळवारी नगरपालिकेने ३५ लाख भरल्यामुळे पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. ...
या सप्ताहात अनेक लग्नतिथी असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात विवाहांचे नियोजन असल्याने प्रवाशांची मात्र गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बस, रेल्वेसह खाजगी बस वाहतुकीलाही यामुळे गर्दी दिसून येत आहे. ...
जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी के ...
येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला. ...