परभणी रोडवरील सतरामैल परिसरामध्ये कुंटणखाना सुरू असून, मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हट्टा पोलीस ठाणे व हिंगोली महिला तपास पथकाच्या वतीने १८ महिलांविरूद्ध कार्यवाही करण्यात आली. ...
येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्रा. आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे वाढली असून औषधी पुरवठा नाही. तर रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास टाळे ठोकले. ...
वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसा ...
जिल्हा परिषदेला ५0५४ लेखाशिर्ष वर्ग करून त्यावर दिलेल्या १.९८ कोटींच्या निधीवरून सध्या जि.प.तील वातावरण गरम झाले आहे. कारण निधी देताना आमदारांनी शिफारस केलेल्या कामांची यादी सोबत जोडलेली असल्याने सदस्यांत नाराजी आहे. यासाठी विशेष सभेत नवीन कामांचा ठर ...
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरींची कामे केवळ मंजूर केली जात आहेत. ती पूर्ण होत नसल्याने खा.राजीव सातव यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. तर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही उपमुकाअ नितीन दाताळ यांना निलंबनाचा प्रस ...
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केल ...
मालवाहू ट्रकचे ब्रेक न लागल्याने उलटून जखमी झालेल्या चालकास तातडीने रूग्णालयात दाखल करून कॅबीनमधील २ लाख रुपयांची रोकड बाळापूर पोलिसांनी ट्रकमालकाच्या स्वाधीन केली. प्रामाणिकपणा अन् माणुसकीचे व कर्तव्य तत्परतेचे अनोखे दर्शन घडविले. ...
तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºय ...
येथे श्री १00८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जिजामातानगर यांच्या वतीने रामाकृष्ण नगरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात आज आरतीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती. ...