येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जिल्हा परिषदेमार्फत गतवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईत जलस्त्रोत अधिग्रहित केलेल्या शेतकºयांना मोबदला देण्यासाठी दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने तसाच पडून आहे. शेतकरी मात्र बँकेचे खेटे घालत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. ...
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने हिसकावली. तो पळुन जात असताना सदर महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. येथील पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाने धाव घेत चोरट्यास पकडले. ...
नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गतच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये पाच वर्षांपासून काम केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना १० जुलै १९७४ च्या शासन निर्णयानुसार रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर (कन्व्हर्टेड रेग्युलर टेम्पररी एस्टॅब्लिशमेंट -सीआरटीई) घेण्याची ...
नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयात नियमबाह्य परीक्षार्थी आढळून आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाच्या चौकशीअंती शिक्षणाचा बाजार मांडणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
शाळा स्तरावर नूतनीकरण अर्जातील विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे एनएसपी-२ या पोर्टलवर ७ ते १६ मेदरम्य ...
आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये नागनाथ संस्थानच्या वतीने परिसरातील आठ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात झाला. गावातून वधू-वरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरले. ...