येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर ८ जानेवारी रोजी विविध संघटना व युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संपात सहभागी संघटनांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले. ...
नांदेड येथून हिंगोली, अकोला मार्गे वाराणसी-गोरखपूर रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे बोर्डाचे सदस्य खा. राजीव सातव यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...
जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
येथील महावितरण कार्यालयासमोर ७ जानेवारी रोजी वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवशीय संप पुकारण्यात आला. संपात जिल्हाभरातील ५०० च्या वर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. ...
वसमत तालुक्यातील आरळ येथील अन्नपूर्णादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अजूनही लटकलेलाच आहे. या शिक्षकांनी आपला प्रश्न न सुटल्यास प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे. ...
कळमनुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दोघांनी कोणाचीही परवानगी न घेता थेट रूग्णालयाच्या प्रसूती व महिलागृहात प्रवेश केला. तसेच यावेळी मोबाईलमध्ये शूटींग काढत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली. ...