फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:51 AM2019-02-04T00:51:28+5:302019-02-04T00:51:31+5:30

तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट काही जणांनी संगणमत फसवणूक केल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात २ फेबु्रवारी रोजी उमाशंकर जैस्वाल यांनी दिली. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Filed in the case of cheating | फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट काही जणांनी संगणमत फसवणूक केल्याची तक्रार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात २ फेबु्रवारी रोजी उमाशंकर जैस्वाल यांनी दिली. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लॉट फसवणूक प्रकरणी उमाशंकर सुरजप्रसाद जैस्वाल यांनी हिंगोली ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हिंगोली तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायत हद्दीतील सर्र्वे नं. २९/०१ मधील प्लॉट क्रमांक २० मनोज भागचंद गुप्ता रा. गणेश अपार्टमेंट जि. अमरावती याने बळसोंड येथील तत्कालीन ग्रामसवेक नंदकिशोर घळे यांच्याशी संगणमत करून बनावट नमुना नं. ८ स्वत:च्या नावाने करून घेतला. त्यानंतर हाच प्लॉट असराजी उर्फ पप्पू चव्हाण यास दिलीप अर्जुन माने व सुनील मधुकर घिगे यांना सोबत घेऊन व साक्षीदार ठेऊन बक्षीस पत्रकाच्या आधारे २७ डिसेंबर २०१८ रोजी दिला. त्यानंतर असराजी उर्फ पप्पू चव्हाण याने तत्कालीन ग्रामसेवक नंदकिशोर घळे यांच्याशी संगणमत करून सदरील प्लॉटचा नमुना नं. ८ स्वत:च्या नावे करून घेतला. त्यामुळे वरील सर्वांनी संगणमत करून फसवणूक केल्याप्रकरणी उमाशंकर जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तत्कालीन ग्रामसेवक बळसोंड नंदकिशोर घळे, असराजी उर्फ पप्पू चव्हाण, मनोज भागचंद गुप्ता, दिलीप माने, सुनील घिगे यांच्याविरूद्ध कलम ४२०, ३४ भादंविनुसार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि ए. डी. सुडके करीत आहेत.
हा प्लॉट विकत घेतला...
मी हा प्लॉट मुळ लेआऊट मालक गुप्ता यांच्याकडून रजिस्ट्री करून विकत घेतला आहे. त्याचे पुरावेही सादर केले. मात्र राजकीय दबावातून या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे असराजी उर्फ पप्पू चव्हाण यांनी सांगितले.

Web Title:  Filed in the case of cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.