कवठ्यापाठोपाठ सिद्धेश्वरलाही ऑक्सिजन बेड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:50+5:302021-04-11T04:28:50+5:30

जिल्हाधिकारी म्हणाले, आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या एकाच गावात मोठ्या प्रमाणात आढळत आहे. अशा गावांमध्ये कंटेन्मेंट झाेन जाहीर केले. ...

Oxygen bed is also available for Siddheshwar | कवठ्यापाठोपाठ सिद्धेश्वरलाही ऑक्सिजन बेड उपलब्ध

कवठ्यापाठोपाठ सिद्धेश्वरलाही ऑक्सिजन बेड उपलब्ध

googlenewsNext

जिल्हाधिकारी म्हणाले, आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या एकाच गावात मोठ्या प्रमाणात आढळत आहे. अशा गावांमध्ये कंटेन्मेंट झाेन जाहीर केले. नागरिकांनी कंटेन्मेंटचे नियम पाळले पाहिजेत. गिरगाव येथे काल भेट दिली असता तेथे गंभीर परिस्थिती आढळली. त्यामुळे या गावात जसा कोरोना चाचणीचा कॅम्प लावला तसाच डोंगरकडा, आखाडा बाळापूर, गोरेगाव, वरखेडा, हयातनगर, शिरड शहापूर अशा जास्त रुग्णसंख्या आढळून येत असलेल्या दहा ते पंधरा गावांत लावण्यात येईल. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांनीही आता तेवढीच काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनात सेवा देण्यास उत्सुकांना थेट नियुक्ती

आगामी काळात मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून दर आठवड्याला आरोग्य सेवेत भरती केली जात आहे. जे कोणी पात्र डॉक्टर, परिचारिका सेवा देण्यास उत्सुक आहेत, त्यांनी हजर झाल्यावर त्यांना लागलीच कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे अशांनी पुढे येण्याची गरज आहे.

खासगी डॉक्टरांना घातली साद

खासगी डॉक्टरांनी आपला दवाखाना सांभाळून शासकीय रुग्णालयातील कोरोना वाॅर्डात किमान एक तास सेवा समाजसेवा म्हणून दिली तरीही जिल्ह्यातील रुग्णांना आणखी चांगली सेवा देता येईल. आणखी काही शासकीय कोरोना सेंटर सुरू करता येतील. खासगी डॉक्टरांनी कंत्राटी तत्त्वावर नेमणूक स्वीकारली तर ते अधिक चांगले.

लसीकरणाला प्रतिसाद

जिल्हाधिकारी म्हणाले, आता लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. एक ते दोन दिवसांत आपल्या जिल्ह्याचा लसींचा साठा संपेल तर याच काळात नवीन साठा मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी लसीकरण करून घेतल्यास जीवाला होणारा धोका टाळणे शक्य आहे. जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रातही लस देत आहेत. तसेच हिंगोलीत कल्याण मंडपम या मध्यवर्ती ठिकाणी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर ठिकाणी असे प्रयोग राबवून लसीकरण वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Oxygen bed is also available for Siddheshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.