कुरुंदा फाट्यावर भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले; चालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 15:43 IST2020-12-12T15:38:36+5:302020-12-12T15:43:28+5:30
चालकाने निष्काळजीपणे ट्रक भरधाव वेगात चालवला

कुरुंदा फाट्यावर भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले; चालक फरार
कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा फाट्यावर माल वाहतूक ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली. संजय शेषेराव बर्गे ( ३६ ) असे मृताचे नाव आहे. घनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.
कुरुंदा फाट्यावरुन एक ट्रक ( क्रमांक एमएच २६ एडी ८३५ ) मोंढ्यातील माल वाहतूक करण्याकरिता जात होता. चालक निष्काळजीपणे ट्रक भरधाव वेगात चालवत होता. यावेळी फाट्यावर संजय शेषेराव बर्गे हे उभे होते. भरधाव ट्रक थेट त्यांच्या अंगावर गेली. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. यामध्ये संजय यांचा जागीच मुत्यु झाला आहे. यावेळी घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला. रात्री उशीरा मयताची ओळख पटली. यानंतर कुरुंदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले,एक मुलगी, आई असा परिवार आहे.
घटनास्थळी सपोनि सुनील गोपिनवार, फाैजदार सविता बोधणकर, जमादार शेख आलीम, बालाजी जोगदंड आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. कुरूंदा पोलीस ठाण्यात ट्रक क्रमांक जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.