एकास जबर मारहाण; तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:54 IST2018-10-09T00:54:21+5:302018-10-09T00:54:34+5:30
वसमत तालुक्यातील सिरळी येथे एकास शेतातील गवत का घेतोस, या कारणावरून तिघांनी संगणमत करून ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कुºहाडीने हातावर गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ८ आॅक्टोबर रोजी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकास जबर मारहाण; तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील सिरळी येथे एकास शेतातील गवत का घेतोस, या कारणावरून तिघांनी संगणमत करून ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कुºहाडीने हातावर गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ८ आॅक्टोबर रोजी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरळी येथील कोंडबा शंखपवळे (२६) हे राम घन यांच्या शेतातील गवत कापीत होते. यावेळी तिघांनी संगणमत करून फिर्यादीस इथले गवत घेऊ नको, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच काठीने व थापडबुक्यांनी मारहाण केली. यातील एकाने हातातील कुºहाडीने डावे हातावर शंखपवळे यांना मारून जबर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी हे गंभीर जखमी असल्यामुळे उपचारासाठी नांदेड येथे हलविले. याप्रकरणी कोंडबा शंखपवळे यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा ठाण्यात आरोपी रामेश्वर आखरे, देवानंद आखरे, शाम आखरे (सर्व रा.सिरळी) तिघांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अंतर्गत प्रतिबंधक सुधारीत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास डीवायएसपी काशिद, सपोनि शंकर वाघमोडे करीत आहेत.